Premium|Financial Independence For Women : निवृत्ती आणि आर्थिक नियोजनाबाबत महिलांनी सजग का असावे?

Financial Independence For Women : निवृत्ती, संपत्तीनियोजन आणि आर्थिक स्वावलंबनाबाबत महिलांचा दृष्टिकोन वेगळा असतो. आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि भविष्यासाठीची तयारी वाढवण्यासाठी महिलांनी आर्थिक व कायदेशीर बाबी समजून घेणे आवश्यक आहे.
Premium|Financial Independence For Women : निवृत्ती आणि आर्थिक नियोजनाबाबत महिलांनी सजग का असावे?
Updated on

विद्या हर्डीकर-सप्रे

बायकांना कायदे, ट्रस्ट, इच्छापत्र म्हणजेच ‘विल’ त्याचे नियम असल्या गोष्टींचा पत्ताच नसतो. घरात कुठलं यंत्र बिघडल किंवा फ्युज जाऊन बंद पडलं, तर काय करायचं हेही त्यांना माहीत नसतं. घरातल्या प्रत्येक गोष्टीसाठी त्या नवऱ्यावर अवलंबून राहतात. याचा परिणाम काय होतो? तर अशा स्त्रियांचा आत्मविश्‍वास कमी होतो. लहानसहान परिस्थितीत भांबावून जातात. काय करावं, कसं वागावं हे समजत नाही.

मला कोणी माझं वय विचारलं तर मी आनंदानं उत्तर देते ‘एकोणतीस’! अहो मीच काय माझ्यासारख्या अनेक स्त्रिया ‘फॉरएव्हर एकोणतीस’ असतात. म्हणजे काय, की आम्हाला ‘म्हातारपण’ आवडत नाही! सेवानिवृत्ती, संपत्तीनियोजन असल्या ‘म्हाताऱ्या’ विषयांवर विचार करायला किंवा बोलायला आम्हाला आवडत नाही. पण आम्ही बायका वयस्कर नाही झालो, तरी आमचे नवरे होतात ना! ते निवृत्त होतात, बायकोवर अवलंबून राहू लागतात आणि ते त्यांना मुळीच समजत नाही. मुख्य म्हणजे बायकोचं मत आणि मन वेगवेगळं असतं, हे त्यांच्या लक्षातच येत नाही. त्यामुळे आपल्याला आवडो की न आवडो, प्रत्येकीला निवृत्ती आणि ‘अवघे पाऊणशे वयमान’ या विषयांवर विचार करावाच लागतो.

आपला याविषयीचा दृष्टिकोन नेमका काय आहे आणि तो पुरुषांच्या दृष्टिकोनापेक्षा वेगळा कसा आहे, हे समजून घेऊन तो मांडावा लागतो. अमेरिकेत उत्तररंग परिषदेत या विषयावर बोलण्यापूर्वी मी थोडंफार संशोधन केलं. भारतीय मैत्रिणींशी गप्पा मारल्या, अमेरिकी शेजारणींनाही चहापानाला बोलवून बोलतं केलं. या सगळ्याचा सारांश असा, की बायकांच्या प्रवृत्ती आणि प्रकृती पुरुषांपेक्षा वेगळ्या असतात. त्यामुळे त्यांचा वयमान, निवृत्ती आणि जीवनाकडं पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. हे पुरुष आणि स्त्रिया दोघांनीही समजून घेणं आवश्यक आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com