Premium|Woodrow Wilson Foreign Policy : विल्सनपासून ट्रम्पपर्यंत; अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात नेमका कसा झाला ऐतिहासिक बदल?

Donald Trump Foreign Policy : युरोपातील शांतता प्रयत्न, वूड्रो विल्सन यांच्या संघराज्याच्या संकल्पना आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या बदललेल्या परराष्ट्र धोरणाचा ऐतिहासिक संदर्भातून घेतलेला अभ्यास.
Woodrow Wilson Foreign Policy

Woodrow Wilson Foreign Policy

esakal

Updated on

डॉ. सदानंद मोरे

युरोपमध्ये शांतता प्रस्थापनासाठी दोन शतके चर्चा झाली, तिच्यातून त्यासाठी आवश्यक असलेल्या संघचौकटीची प्रगती झाली नाही, हे पहिल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर निदर्शनास आणणाऱ्या वॉनला विल्सनच्या कृतीमुळे काय दिलासा आणि काय समाधान मिळाले असेल ते असो, मात्र त्यानंतर शंभर वर्षांनी सत्तेवर आलेल्या डोनाल्ड ट्रम्पनी विल्सनचे धोरण पूर्णपणे उलटे करून वेगळ्या प्रकारच्या परराष्ट्रनीतीचा अवलंब केला, हे सर्वजण जाणतात.

विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या पंचविशीत पहिले महायुद्ध रंगात आले असताना, म्हणजे इ.स. १९१६मध्ये सी. ई. वॉनने रुसो (पेरी) यांच्या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर (A Lasting Peace Through the Fedearation of Europe या नावाने) केले हे उचितच म्हणावे लागते. युरोपातील गेल्या दोन शतकांमधील शांतीचर्चा व्यर्थच ठरली असली तरी तिचे पुनरुज्जीवन करायला हवे असे भाषांतरकाराला नक्कीच वाटले असणार, हे स्पष्ट आहे. पुस्तक प्रकाशित झाले ते १९१७मध्ये. पहिल्या महायुद्धाच्या पहिल्या पर्वात अमेरिकेचा राष्ट्रप्रमुख वूड्रो विल्सन तटस्थ व अलिप्त राहिला होता. त्यामुळे वॉनच्या पुस्तकातील त्याचे संदर्भ अपेक्षावजा येतात, हे लक्षात ठेवले पाहिजे. विशेष म्हणजे या मुद्द्याची दखल प्रकाशकांनी एका स्वतंत्र पृष्ठावर घेतली आहे. शांतीच्या प्रस्थापनेसाठी सर्व (युरोपीय ख्रिस्ती) राष्ट्रांचा संघ (किंवा संघराराज्य) - Federation निर्माण करणे ही गोष्ट अठराव्या शतकात अ वघडच होती याची नोंद करून वॉन कबुली देतो, ‘it is infinitely harder now’! असे असूनही ही स्थापना तेव्हापेक्षा आज अधिक अव्यवहार्य वाटत असली, तर तिची आवश्यकता तेव्हापेक्षा हजारोपटींनी वाढली आहे, असा वरकरणी विरोधी वाटणारा शेरा वॉन मारतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com