डॉ. स्वाती राजेश श्रोत्री
आज वैशालीला सून म्हणून नॉन-मेडिको मुलगी हवी अशी अट घालताना ऐकून रेवती विचारात पडली. मेडिको असून सहचारिणी किंवा आई म्हणून मी कुठे कमी पडते का? सगळं तर जमवलं की! डॉक्टर आई, डॉक्टर बायको, डॉक्टर सून, डॉक्टर बहीण... कुठेच कधीच कमी न पडण्याचा सतत प्रयत्न केलाच की! आणि हे करत असताना अनेक समस्यांना सामोरंही गेले.
रात्रीचे नऊ वाजले होते. रेवती क्लिनिकवरून घरी पोहोचतच होती, तितक्यात तिचा फोन वाजला. तिच्या मैत्रिणीचा, वैशालीचा फोन होता. हाय-हॅलो झाल्यावर वैशाली म्हणाली, ‘‘अगं, आज एकदाचं शुभमंगलच्या ऑफिसमध्ये जाऊन आदित्यचं नाव नोंदवलं बघ. स्थळासाठीच्या अपेक्षा वगैरे सगळं सांगून आले.’’
‘‘ वा! छानच की... आमचं अजून नीलशी बोलणं झालं नाही काही याबाबतीत, पण आम्हीही त्याचं नाव नोंदवूच आता इतक्यात. तुम्ही अपेक्षा काय काय सांगितल्या गं?’’ रेवतीनं उत्सुकतेनं विचारलं.
‘