Premium|Work Life Balance : ‘वर्क-लाइफ बॅलन्स’ की ‘वर्क-लाइफ इंटिग्रेशन’? संतुलित, परिपूर्ण आणि अर्थपूर्ण आयुष्याचा नवा विचार

Personal Life Balance : वर्क-लाइफ बॅलन्सचा आठ-आठ तासांचा फॉर्म्युला प्रत्येकासाठी योग्य नसतो. व्यक्तीच्या मूल्यांनुसार, जबाबदाऱ्यांनुसार आणि मानसिक-शारीरिक गरजांनुसार वेळ, ऊर्जा आणि आयुष्याचे संतुलन बदलते.
Work Life Balance

Work Life Balance

esakal

Updated on

देवयानी एम.

वर्क-लाइफ बॅलन्सची एकच, सर्वांसाठी लागू होणारी व्याख्या असू शकत नाही. कारण बॅलन्स हा एखादा ठरावीक फॉर्म्युला नसून तो व्यक्तीच्या मूल्यांवर, जीवनाच्या त्या त्या टप्प्यावर, जबाबदाऱ्यांवर, करिअरच्या स्वरूपावर आणि मानसिक-शारीरिक गरजांवर अवलंबून असलेला वैयक्तिक अनुभव आहे. त्यामुळे दररोज आठ तास काम, आठ तास वैयक्तिक आयुष्य आणि आठ तास झोप असा गणिती हिशोब बॅलन्सची सार्वत्रिक व्याख्या होऊ शकत नाही.

‘वर्क-लाइफ बॅलन्स’ हे शब्द तुम्हीही ऐकले आहेत का? हे शब्द आज इतके प्रचलित झाले आहेत, की ते जणू आधुनिक जीवनाचा एक अनिवार्य मंत्रच वाटावेत. सकाळी काम, संध्याकाळी कुटुंब, मधे व्यायाम, थोडा ‘मी-टाइम’, विकेंडला प्रवास आणि रात्री मोबाईल बाजूला ठेवून शांत झोप या सगळ्यांची व्यवस्थित विभागणी केली की आयुष्य संतुलित होईल, असा फॉर्म्युला सांगितला जातो. पण आयुष्य इतकं सोपं नसतं, त्यामुळे अशा ढोबळ फॉर्म्युल्यापलीकडे जाऊन विचार करावा लागतो. मी योग थेरपिस्ट आणि लाइफस्टाइल कोच म्हणून लोकांशी जेव्हा बोलते, तेव्हा एक गोष्ट वारंवार अनुभवते, ती म्हणजे अनेकांना ‘बॅलन्स’ हवा असतो, पण नेमका कशाचा आणि कोणत्या अर्थानं, हे स्पष्ट नसतं. काहींसाठी कुटुंबासाठी जास्त वेळ देता येणं म्हणजे बॅलन्स, तर कुणासाठी वेळोवेळी प्रवास करायला मिळणं, कुणासाठी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं, तर कुणासाठी आर्थिक सुरक्षितता मिळवणं म्हणजे बॅलन्स. म्हणूनच वर्क-लाइफ बॅलन्सकडे केवळ ‘कामाचे तास कमी करा’ या सूत्रातून पाहणं म्हणजे या विषयाचं अतिसुलभीकरण होईल. खरा प्रश्न वेगळा आहे - आपण ज्या प्रकारचं जीवन जगू इच्छितो, त्यासाठी आपल्या वेळेचा, ऊर्जेचा, एकाग्रतेचा वापर योग्य पद्धतीनं होत आहे का?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com