रोहन नामजोशी
हल्ली पुस्तकं कोण वाचतो, या तक्रारवजा प्रश्नाला वर्ल्ड बुक फेअर हे एक सणसणीत उत्तर आहे. हल्लीच्या तरुण पिढीबद्दल, जेन झीबद्दल थोडा हेटाळणीचा स्वर असतो, पण त्यांची पुस्तकखरेदी पाहिल्यावर थक्क व्हायला होतं! एखाद्या मोठ्या प्रकाशकाच्या स्टॉलवर पुस्तकं चाळण्याच्या निमित्तानं या पिढीचं बोलणं ऐकलंत, तर तुम्ही त्यांच्या विश्वात डोकावू शकता.