निकिता कातकाडे
मानवाची स्थापत्यकौशल्ये आणि यंत्रसामर्थ्य यांचे दर्शन जगातील भव्य आणि अद्भुत पायाभूत सुविधांमधून होते. भौगोलिक अंतर कमी करून जग जोडण्याचे प्रयत्न प्राचीन काळापासून आजपर्यंत सतत सुरू आहेत.
महामार्ग, विमानतळ, बंदरे, रेल्वे आणि विविध कारणांसाठी बांधलेल्या इमारती यांसारख्या भव्य प्रकल्पांनी जगाला गतिमान केले आहे. पॅन-अमेरिकन महामार्ग जगाला जोडतो, तर सौदी अरेबियातील किंग फहद विमानतळ क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे.
दुबईतील बुर्ज खलिफा मानवी कल्पकतेची आकाशाला भिडणारी शिखरे गाठतो, तर शांघाय पोर्ट जागतिक व्यापाराचे नाक आहे. जवळजवळ सगळीच्या सगळी अमेरिका जोडणारे विशाल रेल्वे जाळे लांबीनुसार सर्वात मोठे आहे, तर भारतीय रेल्वे कर्मचारी व प्रवासी संख्येत आघाडीवर आहे.
या पायाभूत सुविधांमुळे केवळ प्रवास सुलभ झाला नाही तर जागतिक व्यापार, पर्यटन, आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यांनाही चालना मिळाली. आधुनिक तंत्रज्ञान, शाश्वत विकास, आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याची सांगड घालून बदलत्या जगातल्या संरचना अधिक मजबूत आणि पर्यावरणपूरक करण्याचे प्रयत्न होत आहेत. जगातील अशा सर्वात ‘मोठ्यां’चा धावता आढावा...