अभिजाता अय्यंगार
योग ही एक सर्वांग सुंदर साधना आहे. ती शरीर व मनाला एकत्र आणते. शरीराला आरोग्य, मनाला स्थैर्य आणि बुद्धीला स्पष्टता प्रदान करते. आसन हा शरीराशी संवाद साधण्याचा अत्यंत व्यावहारिक मार्ग आहे. शरीर पूर्ण समजून घेतल्यानंतर ते आपल्याला आतल्या प्रवासाकडे मार्गदर्शन करते.
बव्हंशी माणसे सुख व आराम शोधतात, कारण ती अस्वस्थतेने, आजारांनी ग्रासलेली असतात. सध्याची जीवनशैली, तंत्रज्ञानाचा व प्रसार माध्यमांचा अतिवापर यांमुळे आपण स्वतःपासून, समाजापासून आणि निसर्गापासून अधिकाधिक दूर जात आहोत. त्याचा परिणाम आपल्या शरीरावर व मनावर होतो.