

Funny Reaction to Viral Social Media Reels
esakal
वाफाळत्या चहाचा पहिला घोट घेतला आणि वाटलं हे सुख आहे. पण गेले कित्येक दिवस चहा पीत नव्हते तेव्हा याची आठवणही आली नव्हती. कुठेतरी मनात जाणीव होती, हे मिळणार नाही त्यामुळे त्याची आसपण ठेवायची नाही. एखाददिवस डाएट मोडल्यानं फार काही आभाळ कोसळणार नव्हतं, पण हे कधीतरीच मिळणार आहे, रोज याची अपेक्षा करायची नाही, याची जाणीव प्रत्येक घासाला ठेवली पाहिजे हेही कळत होतं.
‘‘वाट माझी बघतोय रिक्षावाला हे गाणं मागं लावलं असतंस तर अजून जास्त व्हायरल झालं असतं का?’’ माझ्याकडे बघत रोहन म्हणाला.
त्यावर मी दोनदा डोळे उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे वळवून त्याच्याकडे बघत, ‘हुं हं’ इतकंच केलं.
‘‘अगं हे काय? सिरियलची प्रॅक्टिस तू आता घरीच करायला सुरुवात केलीस की काय?’’
‘‘अरे मला आता प्रॅक्टिस करायचीपण गरज नाही. मला तर वाटतं मी कधीतरी रात्री झोपेतून उठूनपण असंच करेन आणि म्हणेन, पल्लवीची एक नजर, चुटकीत होईल सगळे हजर!’’
‘‘पण मला एक कळलं नाही... तू त्या रिक्षाच्या व्हिडिओत तोंडावरचा स्कार्फ का नाही काढलास?’’