

Sarvam AI Sarvam-1 launch
esakal
ब्रिजेश सिंह - brijeshbsingh@gmail.com
जेव्हा एखादा शेतकरी आत्मविश्वासाने मोबाईलशी मराठीत बोलून शेतीचे नियोजन करेल आणि प्रत्येक भारतीय विद्यार्थी भाषेचा अडथळा ओलांडून जगातील ज्ञानाशी जोडला जाईल, तेव्हाच एआय क्रांतीचे फळ खऱ्या अर्थाने मिळाले, असे म्हणता येईल. ‘सर्वम एआय’ स्टार्टअपची झेप म्हणजे जगाला दिलेले एक उत्तर आहे, की तंत्रज्ञानाच्या युगात भाषिक विविधता अडथळा नाही.
भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या एक सुवर्ण अध्याय लिहिला जात आहे. ही कथा केवळ सिलिकॉन चिप्स किंवा गुंतागुंतीच्या कोडिंगची नाही; तर ती आहे आपल्या अस्मितेची, आपल्या मातीतील विविध भाषांची आणि त्या कोट्यवधी भारतीयांच्या स्वप्नांची, जे आजवर डिजिटल क्रांतीच्या मुख्य प्रवाहापासून काहीसे दूर होते. ‘सर्वम एआय’ (Sarvam AI) या स्टार्टअपची झेप हे जगाला दिलेले एक उत्तर आहे, की तंत्रज्ञानाच्या युगात भाषिक विविधता हा अडथळा नसून, ती भारताची सर्वात मोठी शक्ती आहे.