Premium|AI decision making : एआय आपला शत्रू नाही तर सोबती! मायक्रोसॉफ्टच्या मंचावर रंगली मातबर मॉडेल्सची अनोखी 'बोर्ड मीटिंग'

Are AI Agents Replacing Human Jobs Reality : एआय तंत्रज्ञानाच्या अफाट प्रगतीचे विश्लेषण करत, मायक्रोसॉफ्टच्या मंचावर ‘एलएलएम काउन्सिल’ने (LLM Council) जगभरातील मातबर मॉडेल्सच्या मदतीने भारताचा सर्वकालीन सर्वोत्तम ‘गोठ’ (GOAT) क्रिकेट संघ कसा निवडला, याचा थक्क करणारा रंजक प्रवास.
Are AI Agents Replacing Human Jobs Reality

Are AI Agents Replacing Human Jobs Reality

esakal

Updated on

अच्युत गोडबोले, रोहित पांढारकर

आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं, की एआय हा कोणीतरी भयंकर शत्रू आहे, तो आपल्या विरोधात टेबलाच्या पलीकडे बसला आहे आणि तो आपल्याला हरवण्यासाठी किंवा आपल्या नोकऱ्या खाण्यासाठीच आला आहे. पण खऱ्या अर्थानं परिस्थिती अगदी वेगळी आहे. आजतरी हे एआय एजंट्स आपल्या विरोधात नाहीत, तर टेबलाच्या आपल्याच बाजूला आपल्याच शेजारी, आपल्या खांद्याला खांदा लावून बसले आहेत. ते आपले अत्यंत हुशार, कधीही न थकता २४/७ काम करणारे आणि जगातल्या माहितीचा अथांग महासागर सेकंदात पिऊन टाकणारे असे मित्र आहेत.

तंत्रज्ञानानं गेल्या काही दशकांमध्ये एवढी प्रचंड झेप घेतली आहे, की कधी कधी आपण खरोखरच एका सायन्स फिक्शनचा सिनेमा पाहतोय की काय, असा प्रश्न पडतो. पूर्वीच्या काळी आपण जेव्हा एखादा निर्णय घ्यायचो, तेव्हा फाइल्सचे ढीग, जुनी रेकॉर्ड्स आणि फार तर काही एक्सेल स्प्रेडशीट्स यांच्यावर अवलंबून राहायचो. पण आता परिस्थिती पार बदलली आहे. सुरुवातीला फक्त आकडेमोड करणारा कॉम्प्युटर आता चक्क माणसासारखा विचार करायला लागला आहे आणि एकमेकांशी वादविवादही करायला लागला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com