
तुम्ही परदेशात फिरायला, शिकायला किंवा अन्य कारणाने जाता, तेव्हा तुम्हाला TCS स्वरूपात कर भरावा लागतो. हा कर नेमका काय असतो? इनकम टॅक्स भरून सुध्दा हा कर का भरावा लागतो? हा कर वाचवण्याच्या कायदेशिर युक्त्या कोणत्या? सरकारकडे जमा झालेला कर परत कसा मिळवायचा? या सगळ्या प्रश्नाची उत्तरे जाणून घ्या ‘सकाळ प्लस’च्या या विशेष लेखातून
परदेश प्रवासाच्या खर्चावर लागणारा TCS कर नेमका काय आहे?
TCS (टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स) म्हणजे तुम्ही परदेश प्रवासासाठी बुकिंग करता, डॉलरमध्ये खर्च करता किंवा परदेशात पैसे पाठवता, तेव्हा सरकार तुमच्याकडून आधीच थोडासा कर घेतं. हा कर बँका, ट्रॅव्हल एजन्सी किंवा कार्ड कंपन्यांमार्फत जमा केला जातो. यामागचा उद्देश म्हणजे भारतातून होणाऱ्या मोठ्या परकीय खर्चावर सरकारचे नियंत्रण ठेवणे आणि करचुकवेगिरी टाळणे.
समजा एखादी व्यक्ती परदेशात लाखो रुपये खर्च करते, पण देशात उत्पन्न कमी दाखवते. अशा बाबी सरकार TCS मुळे सहज पकडू शकते. २०२५ पासून, जर तुमचा परदेश प्रवासाचा किंवा पैसे पाठवण्याचा खर्च वर्षाला ₹१० लाखांपर्यंत असेल, तर TCS लागू होणार नाही. पण त्या पुढील खर्चावर ₹१० लाखांपर्यंत ५% आणि उर्वरित रकमेवर २०% TCS आकारला जातो. ही भरलेली रक्कम तुम्ही नंतर आयकर रिटर्न भरताना परत मागू शकता.