Premium|Study Room : अशक्य ते शक्य! सेबॅस्टियन सेवने दोन तासांत मॅरेथॉन पूर्ण करून रचला नवा जागतिक विक्रम

Sebastian Sawe London Marathon : केनियाच्या सेबॅस्टियन सेवने लंडन मॅरेथॉनमध्ये १ तास ५९ मिनिटे ३० सेकंद अशी वेळ नोंदवत दोन तासांचा अडथळा पार केला. तांत्रिक बूट, व्ही-शेप धावण्याची पद्धत आणि अफाट मेहनतीमुळे त्याने जागतिक क्रीडा इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नाव कोरले.
Sebastian Sawe London Marathon

Sebastian Sawe London Marathon

esakal

Updated on: 

केनियाच्या सेबॅस्टियन सेव याने लंडन मॅरेथॉनमध्ये दोन तासांपेक्षा कमी वेळात मॅरेथॉन पूर्ण करून इतिहास घडविला. दुर्दम्य इच्छाशक्ती, व्यवस्थित नियोजन आणि तंत्रज्ञानाची जोड या जोरावर त्याने १ तास ५९ मिनिटे ३० सेकंद अशी विक्रमी वेळ नोंदवली. मॅरेथॉन शर्यत (४२.१९५ किमी) दोन तासांच्या आत पूर्ण करणारा तो जगातला पहिला धावपटू ठरला.

कोण आहे सेबॅस्टियन?

अ) परिचय : सेबॅस्टियन सेव हा केनियाचा लांब पल्ल्याचा धावपटू आहे.

ब) सुरुवात : त्याने प्राथमिक शाळेत असल्यापासूनच धावण्यास सुरुवात केली होती.

क) प्रशिक्षक : तो क्लाउडिओ बेरार्डेली यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.

ड) सराव : त्याच्या सरावात दर आठवड्याला सुमारे २४१ किमी धावण्यासारख्या अत्यंत कठोर व्यायामांचा समावेश असतो.

ई) वैयक्तिक माहिती : तो ३१ वर्षांचा असून, त्याने गेल्या वर्षीच्या बर्लिन आणि लंडन मॅरेथॉनमध्ये सुवर्णपदक मिळवले आहे.

फ) पूर्वीची कामगिरी : त्याची यापूर्वीची मॅरेथॉनमधील सर्वोच्च वेळ २ तास २ मिनिटे ०५ सेकंद होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com