Premium|Patent vs Farmers Rights : एका बियाण्याच्या DNA वरून जगभरात न्यायालयीन लढाया का होत आहेत? हवामान बदलाच्या युगात बीज, पेटंट आणि अन्नसुरक्षेची लढाई

Patented Seeds : हवामान बदल आणि पेटंट केलेल्या बियाण्यांमुळे जगातील पारंपारिक शेती धोक्यात येऊन, काही मोजक्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हातात अन्न सुरक्षेची सूत्रं जाण्याचा धोका?
seed war in the world

seed war in the world

Esakal

Updated on

पुणे – आजही संक्रातीसारख्या सणाच्या माध्यमातून महिला एकमेकींना वाण देतात. गेल्या अनेक वर्षापासूनची ही परंपरा आजही सुरू आहे पण दुसरीकडे याच वाणासाठी जगभरात न्यायालयीन लढाया सुरू झाल्या आहेत. हजारो वर्षांपासून शेतकऱ्यांनी स्वतः बियाणं जपलं, निवडलं, त्यांची देवाणघेवाण केली आणि मातीशी जुळणारं उत्तम वाण विकसित केलं. पण आता आधुनिक जैवतंत्रज्ञान, कठोर पेटंट कायदे आणि बाजारातील वाढत्या कॉर्पोरेट केंद्रीकरणामुळे बियाणं शेतीचं साधं साधन राहिलेलं नाही, तर ती अब्जावधी डॉलर्सची बौद्धिक संपदा बनली आहेत. एका बाजूला कंपन्या त्यांनी केलेल्या गुंतवणुकीचे रक्षण करण्यासाठी पेटंट्सची मागणी करतायेत, तर दुसरीकडं शेतकऱ्यांचा पारंपरिक हक्क, जैवविविधता आणि अन्नस्वातंत्र्य धोक्यात आलं आहे. त्यामुळं हा लढा केवळ पेटंट्स किंवा काही कायद्यांपुरता मर्यादित नाही, तर भविष्यातील अन्नसुरक्षा आणि आपल्या ताटावरील अंतिम नियंत्रण नेमकं कोणाच्या हातात असणार, हा आजच्या काळातील सर्वात मोठा आणि कळीचा प्रश्न आहे.

जगभरात कुठे कुठे हे प्रश्न निर्माण झाले आहेत, भारतात याची काय परिस्थिती आहे, बियाण्यांचं पेटंट म्हणजे काय, बहुराष्ट्रीय कंपन्यांकडे याचा किती वाटा आहे हे सगळं आपण सकाळ+ च्या विशेष लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com