
सुनंदन लेले
sdlele3@gmail.com
गेल्या पंधरवड्यात क्रिकेट जगतात खूप मोठे निर्णय झाले आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने पाठोपाठ कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचे निर्णय घेतले. नंतर निवड समितीने अजिंक्य रहाणे आणि चेतेश्र्वर पुजाराच्या अनुभवापेक्षा तरुण खेळाडूंवर विश्वास ठेवायचा निर्णय घेतलाच, वर जसप्रीत बुमराला मागे ठेवताना शुभमन गिलकडे कसोटी संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवली. निवड समितीचे निर्णय धाडसी वाटत असले तरी त्याचा सुगावा किंवा अंदाज थोडा लागला होता. एक नक्की आहे, भारतातच काय कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या देशांबरोबर आत्ता मी भटकंती करत असलेल्या अमेरिकेतही या धाडसी निर्णयांवर मोठ्या प्रतिक्रिया कानावर आल्या.