
पुणे : ‘मी जिवंत असताना मला तू त्रास दिलास, आता मला गेलेलं बघून तुला त्रास होत राहील, तू फक्त बघच’....
‘मला फक्त जीव द्यायचा होता, माझ्या प्रेयसीला, तिच्या कुटुंबियांना अपराधी वाटावं यासाठी मी हे पाऊल उचललं’ ... आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांनी मानसशास्त्राचा अभ्यास कऱणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलेली ही उत्तरं.
भारतच नव्हे तर जगभरात सूड भावनेनं आत्महत्येच्या घटना घडतात.
व्हिडिओ किंवा स्टेटसला पोस्ट शेअर करत टोकाचं पाऊल उचलल्याच्या घटनाही घडतात.
आत्महत्येसारखे विचार मनात डोकावून जातात हे खरं पण जेव्हा प्रत्यक्ष कृती घडते त्यावेळी नेमकं मेंदूत काय सुरु असतं..?
दुसऱ्याला फक्त अपराधीपणाची भावना द्यावी, यासाठी टोकाचं पाऊल उचलावं, या मागची कारणं काय?
जाणून घेऊया 'सकाळ प्लस' मधील या लेखाच्या माध्यमातून...