
शैलजा तिवले
सांगली : सांगलीतील १२ वर्षाच्या निखिता ( नाव बदलले आहे) अबॅकसमध्ये उत्तम कामगिरी करत मागासवर्गीयांसाठी असलेली शिष्यवृत्ती प्राप्त केली. परंतु तिचा जातीचा दाखला नसल्याने शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरूनही तिला याचा फायदा मिळालेला नाही. “ही शिष्यवृत्ती मिळाली असती तर वर्षाला १३ हजार रुपये मिळाले असते आणि तिच्या शिक्षणासाठी याची मोठी मदत झाली असती” असं निखिताची आई, सेक्स वर्कर निमा (नाव बदलले आहे) तळमळीने सांगतात.