
अविनाश नरहर जोशी
मला आठवतंय, मी कॉलेजमध्ये असताना एका प्राध्यापकांनी पुणे विद्यापीठाचा उल्लेख महाराष्ट्राचं ऑक्सफर्ड असा केला होता. मी विलियम शेक्सपिअरची जन्मभूमी, त्याचं घर बघून आलो, तेव्हा असं वाटलं की विल्यम शेक्सपिअरला इंग्लंडचा कालिदास का म्हणू नये?
इंग्रजांनी सुमारे चारशे-साडेचारशे वर्षांपूर्वीचं शेक्सपिअरचं घर किंवा स्मारक अत्यंत सुंदररितीनं सांभाळलं आहे. शेक्सपिअरचा जन्म झाला ती खोली, त्याचा छोटासा लाकडी पाळणा आणि त्याकाळातली भांडीकुंडी, इतर कितीतरी गोष्टी अजूनही अतिशय जपून व्यवस्थित ठेवल्या आहेत. आपली परंपरा, संस्कृती जपणं आणि ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे इंग्रजांचं वैशिष्ट्य इंग्लंडमध्ये फिरताना सगळीकडे जाणवलं.