Premium|Shikhar Shingnapur Folk Tradition : शिखर शिंगणापूरच्या महादेवगीतांची समृद्ध मौखिक परंपरा आता लोपाच्या उंबरठ्यावर

Maharashtra Oral Folk Songs : शिखर शिंगणापूरच्या लोकपरंपरेतील महादेव-पार्वतीवरील गाणी, ओव्या आणि मौखिक साहित्याने महाराष्ट्राची लोकसंस्कृती समृद्ध केली; मात्र बदलत्या काळात ही मौखिक परंपरा आता हळूहळू लोप पावण्याच्या मार्गावर आहे.
Shikhar Shingnapur Folk Tradition

Shikhar Shingnapur Folk Tradition

esakal

Updated on

संजीव भागवत - sakal.avtaran@gmail.com

'महादेवाच्या वाटेनं देवा गा दवना आला मोठा दाट... भगत अरवट दवना मोडून केली वाट’... शिखर शिंगणापूरच्या लोकसंस्कृतीत आणि सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये येणाऱ्या दवण्यावरील हे गाणे. अशा प्रकारची असंख्य गाणी शिखर शिंगणापूरच्या लोकपरंपरेमध्ये महिलांकडून म्हटली जातात. शंभू महादेवांवरील मौखिक संपदा प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे. ग्रामीण भागातील महिलांनी महादेव-पार्वतीवर केलेल्या गाण्यांनी महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीमध्ये सर्वात मोठी भर टाकली आहे. साहजिकच त्यांच्या गाण्यांना वगळून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा अभ्यासच होऊ शकत नाही, इतक्या त्या समाजमनात खोलवर रुजलेल्या आहेत. शिखर शिंगणापूरच्या लोकपरंपरेत मौखिक साहित्यातील रचनांचे अनेक संशोधकांनी संकलन केलेले आहे.

डॉ. सरोजिनी बाबर, प्रा. बाबासाहेब बळे आदींचे त्यासाठी मोठे योगदान राहिलेले आहे. डॉ. बाबर यांनी संपादित केलेल्या ‘कुलदैवत’ आणि डॉ. रा. चिं. ढेरे यांनी आपल्या ग्रंथात गौरव केलेल्या प्रा. बळे यांच्या ‘धुळोबा-भिवाया, धनगरांच्या देवता’ या ग्रंथात मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील महिलांनी म्हटलेली अनेक गाणी-ओव्या जतन करून ठेवण्यात आल्या आहेत; मात्र अलीकडच्या काळात या गाण्यांची एक समृद्ध परंपरा खंडित होण्याच्या मार्गावर येऊन ठेपली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com