Premium|Chh. Shivaji Maharaj : शिवरायांच्या मोहिमेने आदिलशाही हादरली; पन्हाळ्यापासून कोल्हापूरपर्यंत स्वराज्याचा विस्तार

Battle of Panhala Fort : आदिलशाहीसोबतचा तह संपल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यविस्तारासाठी आक्रमक मोहीम हाती घेतली. कोंडाजी फर्जंद यांनी पन्हाळा जिंकला, तर मराठा सैन्याने परळी, सातारा आणि कोल्हापूर परिसरात आपला प्रभाव वाढवला.
Chh. Shivaji Maharaj

Chh. Shivaji Maharaj

esakal

Updated on: 

अनिकेत यादव - इतिहास अभ्यासक

आदिलशाहीसोबत सप्टेंबर १६६७पासून सुरू असलेला तह डिसेंबर १६७२मध्ये संपुष्टात आला. राजांनी आदिलशाहीवर घनघोर आक्रमणाचे रणशिंग फुंकले. कोंडाजी फर्जंद यांनी अवघ्या ६० मावळ्यांनिशी ६ मार्च १६७३ रोजी पन्हाळा जिंकला. पाठोपाठ परळी, सातारा, कोल्हापूरपर्यंतचा आदिलशाही प्रांत स्वराज्यात दाखल झाला. प्रतापराव गुजर यांनी उमराणीच्या युद्धात बहलोलखानाची दाणादाण उडवत हुबळीची मोठी लूट केली. दंडाराजपुरीच्या सिद्दीलाही शिवसैन्याने सडेतोड उत्तर दिले.

आदिलशाहीसोबतचा तह मोडला : अली आदिलशाह दुसरा याचा २४ नोव्हेंबर १६७२ रोजी मृत्यू झाला आणि त्याचदिवशी त्याचा ५ वर्षांचा मुलगा सिकंदर गादीवर विराजमान झाला. शिवाजीराजांचा कट्टर वैरी असलेल्या सिद्दी खवासखानाच्या हाती सल्तनतीचा सर्व कारभार आला. त्यामुळे राजांनी विजापूर दरबारात असलेले आपले वकील बाबाजी नाईक पुंडे यांना परत बोलावले. परिणामी, सप्टेंबर १६६७ पासून दोन्ही राज्यांमध्ये असलेले मैत्रीसंबंध डिसेंबर १६७२मध्ये संपुष्टात आले. आता आदिलशाहीशी संघर्ष अटळ असल्याने राजांनी काही काळासाठी मुघल आघाडीवर बचावात्मक पवित्रा ठेवला, तर आदिलशाही सरदारांनी स्वराज्यावर आक्रमण करण्यापूर्वीच त्यांच्या प्रदेशावर घनघोर आक्रमणाचे रणशिंग फुंकले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com