
केदार फाळके
editor@esakal.com
जयसिंहाबरोबर झालेल्या तहात शिवाजी महाराजांनी स्पष्ट अट घातली की, त्यांना मनसब स्वीकारण्यास भाग पाडले जाणार नाही आणि नियमितपणे मुघल दरबारात उपस्थित राहावे लागणार नाही. जयसिंहाने ही अट औरंगजेबास कळविली.
शिवाजी महाराजांचे आग्र्याला प्रस्थान
तथापि, पुरंदराहून आदिलशाहीवर मोहिमेस निघण्यापूर्वी औरंगजेबाने जयसिंहास हुकूम सोडला की, शिवाजी महाराजांना दरबारात हजर करण्यासाठी पाठवावे. त्यावर जयसिंहाने असे म्हणणे सादर केले की, मी प्रथम शिवाजी महाराजांना माझ्याबरोबर आदिलशाहीविरुद्ध सुरू केलेल्या मोहिमेत घेऊन जाईन आणि त्यानंतर त्यांना दरबारात हजर करीन. त्याने औरंगजेबास लिहिलेल्या पत्रात नमूद केले. शिवाजी महाराजांना दरबारात हजर करण्याकरिता हजार युक्त्या लढविल्या. त्या युक्त्या नेमक्या काय होत्या, हे ज्ञात नाही.