
केदार फाळके
editor@esakal.com
कोंढाणा पुन्हा एकदा स्वराज्यात
शिवाजी महाराजांनी १३ ऑगस्ट, १६५७ पूर्वी खेडेबारे तपा आणि कोंढाणा दुर्ग जिंकून घेतला. त्यांनी इथे नमूद केलेल्या तारखेस खेडेबारे तप्याच्या कारकुनांना जे पत्र पाठविले होते, त्यात म्हटले होते, ‘‘साहेबांचे कारकून महालास आले आहेत, ते साहेबाचे खुर्दखताचा उजूर करितात, साहेबी मेहेरबान होऊन देविले पाहिजे’’ अशी मागणी तेथील इनामदारांनी केली आहे.
त्यावरून इनामे मागील वर्षी जशी चालू होती, तशी यावर्षीही चालू ठेवावीत अशी आज्ञा शिवाजी महाराजांनी केली होती. या पत्रावरून हे स्पष्ट होते की, पत्राच्या तारखेपूर्वी खेडेबारे तपा आणि कोंढाणा दुर्ग शिवाजी महाराजांच्या ताब्यात आले होते.