Premium|Maratha War History : स्वराज्याची पहिली रणधुमाळी

Battle of Khalad-Belsar 1648 : स्वराज्यावर चालून आलेल्या फतहखानाच्या पहिल्या संकटाचा शिवरायांनी पुरंदर आणि शिरवळच्या युद्धात धूळधाण उडवून पराभव केला. अवघ्या १९ वर्षांच्या शिवबांच्या युद्धनीतीमुळे आदिलशाही सैन्य पळता भुई थोडी झाली आणि स्वराज्याच्या विजयाचा पाया रचला गेला.
Battle of Khalad-Belsar 1648

Battle of Khalad-Belsar 1648

esakal

Updated on

अनिकेत यादव - इतिहास अभ्यासक

शाहजीराजांचा स्नेही रनदौलाखान १६४३-४४मध्ये वारला आणि त्यांचा वैरी असणाऱ्या मुस्तफाखानाचा आदिलशाही दरबारात प्रभाव वाढला. अखेर विविध कारणांचे निमित्त होऊन २५ जुलै १६४८ रोजी शाहजीराजांना कैद केले. त्यानंतर मुस्तफाखानाने बंगलोर येथील शाहजीराजांचे थोरले पुत्र संभाजीराजांविरुद्ध तानाजी दुरे, विठ्ठल गोपाळ व फर्हादखान यांची रवानगी केली. तर कऱ्हाड प्रांतावर खैरियतखानास धाडले. आणि ऑगस्ट १६४८मध्ये आदिलशाहाने शिवाजीराजांविरुद्ध खुदावंतखान उर्फ फतहखानास रवाना केले.

मागे एका लढाईत फतह (विजय) मिळविली म्हणून यास ‘फतहखान’ हा किताब देऊन आदिलशाहने गौरविले होते. लष्करी मोहिमांच्या विजयाचा अनुभव गाठीशी असणाऱ्या या फतहखानाला ५ ते ६ हजार सैन्यासह मिनाद शेख, रतन शेख, दुसरा एक फतहखान, अश्रफशाह, मुसेखान, मताजी घाटगे, फलटणचा बजाजी निंबाळकर, बाळाजी हैबतराव हे सरदार सोबत दिले होते. ज्याअर्थी एवढ्या सरदारांची फौज याच्या नेतृत्वात दिली गेली, त्याअर्थी फतहखान आदिलशाहीतील मातब्बर सरदार असावा. शिवाजीराजांच्या तयारीची काहीच कल्पना नसल्याने, फार प्रतिकार होणार नाही, नुसत्या दटावणीनेच काम भागेल असा आदिलशाहाचा कयास होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com