

Chh. Shivaji Maharaj History
esakal
अनिकेत यादव - इतिहास अभ्यासक
भारतभर २२ सुभ्यांमध्ये पसरलेले मुघल साम्राज्य, त्यातून कसेबसे अस्तित्व टिकवून उभ्या असलेल्या आदिलशाही व कुत्बशाही सल्तनतींमधून स्वतःचे राज्य निर्माण करणे ही कल्पनाच मुळी अशक्यप्राय होती. तेच निर्मिण्याचे स्वप्न दाखवून स्वराज्यसंकल्पक शाहजीराजांनी जिजामाता व बारा वर्षांच्या शिवाजीराजांना बंगळूरहून पुण्याला रवाना केले.
अस्मानी व सुलतानी संकटे
दुष्काळें आटिलें द्रव्यें नेला मान।
स्त्री एकी अन्न अन्न करितां मेली॥
वरी या दुष्काळें पीडा केली।
बरें गेलें धन ढोरें गुरें।
पिकें गेलीं करपून। हतबद्ध झाले जन॥
बैसोनियां तक्तां। अन्नेंविण पिडिती लोकां॥
मुदबख लिहिणे। तेलतुपावरी जिणें॥
नीचाचे चाकर। चुकलिया खाती मार॥
राजा प्रजा पीडी। क्षेत्री दुश्चितासी तोडी॥