Premium | Karnataka Campaign : शिवरायांची कर्नाटक मोहीम कशी गाजली? जिंजीपासून कावेरीपर्यंत स्वराज्याचा विस्तार!

Southern Expedition of Shivaji Maharaj : शत्रूच्या सैन्याची पावसामुळे हालचाल मंदावली असताना शिवरायांनी मात्र ऋतुमानाचा अचूक अंदाज घेत दक्षिणेकडे कूच केली! त्यांच्या या मोहिमेत भूगोल, मुत्सद्देगिरी आणि लष्करी रणनीतीचा कसा वापर झाला?
Chhatrapati Shivaji Maharaj

Chhatrapati Shivaji Maharaj

esakal

Updated on: 

ऋतुमानाचा अचूक अंदाज घेत राजांनी पूर्व किनारपट्टीवरील विजापुरी कर्नाटक प्रांताकडे कूच केले. श्रीशैलम व तिरुपतीचे दर्शन घेऊन त्यांनी आपल्या मोहिमेचा झंझावात सुरू केला. आपल्या मुत्सद्देगिरीने जिंजीचा किल्ला ताब्यात घेऊन त्याचे बळकटीकरण केले. शेरखान लोदीचा समूळ पराभव करून त्याच्या सर्व प्रदेशावर ताबा मिळविला. मदुरा व अन्य नायकांशी लष्करी करार केले आणि कावेरीपर्यंतचा प्रदेश स्वराज्याशी जोडून आपली अजेय सत्ता प्रस्थापित केली.

ऋतुमानाची अचूक रणनीती

सामान्यतः जून ते सप्टेंबर या नैऋत्य मान्सूनच्या ४ महिन्यात सह्याद्री व दख्खनच्या पठारावर पडणाऱ्या पावसामुळे लष्करी मोहिमा थांबवाव्या लागत असे. मात्र, याच काळात पूर्व किनारपट्टीवर (कोरोमंडल) नैऋत्य मान्सूनचा पाऊस अत्यंत कमी पडतो. त्यावेळचे ढगाळ हवामान आणि तुरळक सरींमुळे रणरणत्या उन्हाचा तडाखा कमी होऊन सैन्याला न थकता लांबच्या हालचाली करणे शक्य होत असे. येथे खरा मुसळधार पाऊस हा ईशान्य मान्सूनच्या (परतीच्या पावसाच्या) रूपाने ऑक्टोबर ते डिसेंबर या ३ महिन्यात पडून लष्करी हालचाली अशक्य होत असे. राजांनी याचा अत्यंत हुशारीने आपल्या रणनीतीत वापर केला. मे ते सप्टेंबर या काळात मुघल व आदिलशाही फौजा दख्खनमधील पावसामुळे छावण्यांत अडकून पडल्या होत्या, तेव्हा राजांनी पूर्व किनारपट्टीवरील कोरड्या हवामानाचा फायदा उचलून कर्नाटक प्रांतातील मोहीम फत्ते केली आणि ऑक्टोबरमधील परतीचा पाऊस सुरू होण्यापूर्वीच आपल लष्करी उद्देश साध्य करून ते परतीच्या प्रवासाला निघाले. राजांनी केवळ शत्रूच्या कमकुवतपणाचाच नव्हे, तर भूगोलाचा आणि ऋतुमानाचाही आपल्या कूटनीतीत किती अचूक व जाणीवपूर्वक वापर केला, हे यावरून दिसून येते.

Loading content, please wait...