

From the Treaty of Purandar to the Bijapur Campaign: A Turning Point in Maratha History
E sakal
Purandar Treaty (1665): The Agreement That Changed Maratha–Mughal Relations
अनिकेत यादव, इतिहास अभ्यासक
मुघलांनी पाच वर्षे स्वराज्याची यथेच्छ नासधूस केल्याने शिवाजी महाराजांनी आता बचावात्मक पवित्रा घेण्याचे ठरविले. राजे १० मे १६६५च्या सुमारास जावळीस गेले होते. मुघल छावणीत गेलेले आपले वकील ९ जून रोजी राजगडावर आल्याचे कळताच राजेही परतले. सर्वांशी चर्चाविनिमय करून व पूर्ण विचारांती पुढील व्यूहरचना आखली. आणि ११ जूनच्या पहाटे राजे राजगडावरून पुरंदर येथील जयसिंहाच्या छावणीकडे जाण्यास निघाले.
राजे छावणीजवळ आल्याचे कळताच, जयसिंहाने आपला चिटणीस उदयराज व उग्रसेन कछवाह यांना राजांना सामोरे जाण्यासाठी पाठवले; आणि त्यांना अशी सूचना दिली की, ‘शिवाजीराजांनी आपले सर्व किल्ले मुघलांच्या स्वाधीन करण्यास संमती दिली तरच त्यांनी आत यावे.’ हा संदेश ऐकून राजे त्यांना म्हणाले, ‘मी बादशाही सेवेत दाखल झालो आहे. माझे अनेक किल्ले बादशाही मुलुखात समाविष्ट केले जातील.’