Premium|Shivaji Maharaj Konkan campaign : छत्रपती शिवाजी महाराजांची दक्षिण कोकणातील विजयी मोहीम; कुडाळ-विंगुर्ला जिंकून समुद्री साम्राज्याचा पाया

Shivaji Maharaj South Konkan Campaign : शायिस्ताखानाच्या पराभवानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण कोकण मोहीम राबवत कुडाळ, वेंगुर्ला परिसरावर पुन्हा स्वराज्याचा झेंडा फडकवला आणि पुढील सुरत मोहिमेची रणनीती आखली.
Shivaji Maharaj Konkan campaign

Shivaji Maharaj Konkan campaign

esakal

Updated on

अनिकेत यादव - इतिहास अभ्यासक

छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६१मध्ये कोकणातील पालवणी, प्रभावळी इ. प्रांत जिंकला होता. दरम्यान, १६६१ ते १६६३ या काळात अजस्त्र मुघल सेना हरप्रकारे स्वराज्याची लचकेतोड करीत होती, त्यामुळे राजांना स्वराज्याबाहेर मोहिमा घेता आल्या नव्हत्या. शायिस्ताखानाला ५ एप्रिल १६६३ रोजी धडा शिकविल्यानंतर लगेचच, १३ एप्रिल रोजी राजांनी दक्षिण कोकणाकडे कूच केले.

दक्षिण कोकण मोहीम (एप्रिल-जून १६६३)

कुडाळवर दुसरी स्वारी ः यापूर्वी १५ फेब्रुवारी १६६०च्या सुमारास शिवसैन्याने कुडाळ जिंकले होते. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावर अडकल्याचे पाहून १८ मार्च १६६०च्या सुमारास लखम सावंतांनी पुन्हा कुडाळ बळकाविले. फेब्रुवारी ते जून १६६१मध्ये राजांनी दाभोळ, राजापूर, पालवणी, प्रभावळी इ. प्रांत घेतला होता, मात्र मुघलांशी सुरू असलेल्या संघर्षामुळे राजांना त्यावेळी लखम सावंतांचा बिमोड करता आला नव्हता. अखेर शायिस्ताखानाने स्वराज्यातून धूम ठोकल्यानंतर राजांनी आपले लक्ष कुडाळकडे वळविले. राजे १३ एप्रिल १६६३ रोजी राजगडाहून दक्षिण कोकणाच्या मोहिमेसाठी निघाले. ते १० हजार पायदळ व ४ हजार घोडदळासह १३ मे रोजी कुडाळमध्ये दाखल झाले. आणि त्यांनी दुसऱ्यांदा कुडाळ जिंकले व रावजी सोमनाथ यांची कुडाळचे सुभेदार म्हणून नेमणूक केली.

वेंगुर्ल्यावर धडक

कुडाळ जिंकल्यानंतर शिवसैन्याने २२ जून १६६३च्या सुमारास वेंगुर्ला व बांदा येथपर्यंत मजल मारली. वेंगुर्ल्यास २००० सैन्य ठेवून ३० जून रोजी राजे कुडाळवरून प्रतापगड व नंतर राजगडावर परतले. (यावेळची कोकण मोहीम राजांनी लवकर आटोपती घेतली, कारण ३ वर्षे मुघलांनी स्वराज्याच्या केलेल्या नासधुसीची भरपाई म्हणून सुरत लुटीची आखणी या काळात राजांना करायची होती.)

सुरत लूट

राजे ६ डिसेंबर १६६३ रोजी राजे सुरतेकडे निघाले. ६ ते ८ जानेवारी या काळात भारतातील सर्वांत समृद्ध बंदर असलेल्या सुरत शहराची लूट केली. आणि ५ फेब्रुवारी १६६४ रोजी राजगडावर सुरक्षित परतले. (या मोहिमेची माहिती पुढील लेखात येईल)

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com