

Asia's largest housing project for bidi workers in Solapur
esakal
नरसय्या आडम
सोलापूर शहरामध्ये विडी कामगारांची संख्या मोठी आहे. मात्र, या कामगारांचे शोषणच होत होते. त्या कामगारांना संघटित करून, त्यांच्या न्याय्य मागण्या पूर्ण केल्या. त्याचबरोबर त्यांना त्यांचे हक्काचे घरकुलही मिळवून दिले.
सोलापूर शहरात अनेक वर्षांपासून विडी कामगार महिलांची मोठी संख्या आहे. हजारो कुटुंबे या व्यवसायात आहेत. या महिला कामगार १९२०च्या दशकात कारखान्यात जाऊन विडी वळायच्या. विडी कारखान्यांचे प्रचंड शोषण होते. त्यावेळी म्हणजे १९१७ मध्ये कॉम्रेड मीनाक्षी साने या सायकलवर सर्व कारखान्यांत फिरून महिला विडी कामगारांच्या प्रश्न सोडवण्यासाठी धडपडत होत्या. त्यावेळी त्या एकमेव महिला कार्यकर्त्या होत्या. नंतर चिंतामणी इंदापुरे व व्यंकप्पा मडूर यांनी खूप काम केले. ‘तू विडी कामगार महिलांसाठी काही तरी कर,’ असे माझ्या आईने तिच्या शेवटच्या क्षणी मला सांगितले. त्यामुळे हे कार्य माझ्यासाठी जीवनमार्ग झाले.