नवी दिल्ल्ली : जगावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या स्पर्धेत आता अमेरिका आणि चीन यांच्यात स्पर्धा सुरु आहे. गेली अनेक वर्ष जागतिक बाजारपेठ प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अमेरिकेच्या ताब्यात आहे. अमेरिकेचा वरदहस्त कमी करत चीन बाजारपेठ खाली आणण्याचा प्रयत्न करताना दिसतोय.
जागतिक राजकारणात या गोष्टी होत असल्या तरी या गोष्टींची नाळ कुठे ना कुठे सामान्यांशी निगडित असते. त्यांच्या या स्पर्धेचा जागतिक बाजारपेठेवर कसा परिणाम होतो आहे याचे एक ताजे उदाहरण इलेक्ट्रिक गाड्यांच्या माध्यमातून समोर आले आहे.
तुमच्या-माझ्या दारात उभी असणारी इलेक्ट्रिक कार... त्या कारची बॅटरी तयार करण्यावरून आता या दोन देशात स्पर्धा सुरु झाली आहे. एकीकडे चीनने 'लिथियम बॅटरी' च्या माध्यमातून बाजारपेठ काबीज केली आहे तर दुसरीकडे मीठ म्हणजेच सोडियमपासून गाड्यांची बॅटरी तयार करण्याचे नवे संशोधन अमेरिकेने केले आहे.
हा सगळा विषय काय आहे? तुमच्या इलेक्ट्रिक कारमधील बॅटरीचा थेट संबंध हा आंतरराष्ट्रीय बाजाराशी कसा निगडित आहे, बॅटरीच्या किंमती आणि चीन अमेरिका यांचा काय संबंध आहे, भविष्यात इलेक्ट्रिक वाहनाच्या किंमती वाढतील की कमी होतील, बॅटरीभोवतीचे हे राजकारण कसे जागतिक राजकारणाशी संबंधित आहे.. जाणून घेऊया