
जयदीप पाठकजी
देशाच्या कोणत्याही भागांत दिवसा किंवा रात्री फिरा, चौकाचौकांत दबा धरून बसलेली भटक्या श्वानांची टोळी कधी हल्ला करील त्याचा नेम नाही. दिवसेंदिवस हिंस्र होत चाललेल्या भटक्या श्वानांकडून दंश केल्याच्या घटना वाढत असून, श्वानदंशाच्या रोज दहा हजार घटना घडतात.
रस्त्यांवर असणारी ही ‘दहशत’ कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ‘नवी दिल्ली-एनसीआर’साठी भटक्या श्वानांना कोंडवाड्यात टाकण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या उत्तराने प्रश्न सुटेल की आणखी जटिल होईल, हे आज कोणीही सांगू शकत नाही. श्वानांना कोंडवाड्यात ठेवल्यानंतर काही कालावधीने ती बाहेर आल्यानंतर निर्माण होणाऱ्या मनुष्य-श्वान संघर्षासाठी आपण तयार आहे का, हाच प्रश्न आहे.