साधना शंकरदक्षिण कोरियासारख्या काही देशांसमोर घटत्या लोकसंख्येचे आव्हान मोठा धोका ठरतोय, असे लोकसंख्याशास्त्रीय अभ्यासाच्या आधारे म्हटले जात आहे. त्यामुळेच लोकसंख्येच्या प्रश्नाचा वेध घेताना बदलत्या परिस्थितीचे भानही ठेवावे लागेल. .अलीकडेच एका स्टार्ट-अप संस्थापकाने ‘एक्स’वर मत व्यक्त केले, की ‘जनसमुदायातील डेटा वापरण्याच्या गतीचा प्रजननदर घटण्याशी संबंध आहे’. हे खरे आहे किंवा नाही हे माहीत नाही. मात्र, यामुळे सध्या सर्व जगाचे लक्ष वेधून घेत असलेल्या एका बातमीची दखल घेणे क्रमप्राप्त झाले आहे. ही बातमी आहे, प्रजननदर घटत असल्याने दक्षिण कोरियाचा अस्त होण्याच्या भीतीची. लोकसंख्या वाढत नसल्याने हा देशच जगाच्या पटलावरून नामशेष होईल की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आपल्याकडे या विषयाचा विचार कोणत्या पद्धतीने होतो, याची दखल घेतली पाहिजे. दक्षिणेकडील काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही जास्त मुले जन्माला घालण्याचे आवाहन आपल्या राज्यातील जनतेला केल्याची बातमी नुकतीच प्रसिद्ध झाली होती. अर्थात त्यांचा यामागचा हेतू वेगळा आहे. लोकसंख्या या निकषावर ज्या सवलती आणि योजना जाहीर होतात, त्यांना दक्षिणेकडील राज्ये वंचित होतात आणि मतदारसंघ पुनर्रचनेतही दक्षिणेकडील राज्यांची खासदारसंख्या कमी होण्याची भीती त्यांना वाटते. म्हणजेच हा राजकीय पैलू झाला. मात्र सरसंघचालकांच्या विधानाचा संदर्भ वेगळा आहे. त्यांनी भाषा, संस्कृती आणि समाज यासंदर्भात या प्रश्नाकडे पाहिलेले दिसते. खरे तर या मुद्याचा आर्थिक विकासविषयक पैलूही तितकाच महत्त्वाचा असून या लेखात प्रामुख्याने त्याची चर्चा केली आहे..आगामी काळातील जागतिक लोकसंख्याशास्त्रीय संक्रमणाचे स्वरूप हे घटत्या प्रजननदराचे राहील. जागतिक बँकेच्या मते, २०२२ मध्ये जागतिक प्रजननदर प्रतिमहिला २.३ होता, जो १९५० मध्ये ४.७ होता. विकसित जगातील देशांचा दर आणखी कमी आहे. दक्षिण कोरिया; जिथे आता धोक्याची घंटा वाजत आहे, तिथे २०२३ मध्ये प्रतिमहिला ०.७२ मुले इतका कमी प्रजननदर होता, जो या वर्षी आणखी घसरून ०.६ वर येण्याची अपेक्षा आहे. उप-सहारा आफ्रिका हा जगातील एकमेव भाग आहे, जिथे प्रजननदर आजच्या काळातही अधिक आहे. राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षण अहवालानुसार, (NFHS) आपल्या देशातील प्रजननदर १९५० च्या दशकातील सहावरून आता प्रतिमहिला केवळ दोनवर आला आहे, जागतिक स्तरावरील घसरणीच्या प्रवृत्तीचे अनुकरण होऊन यात आणखी घट होण्याची शक्यता आहे.प्रजननदरात (बदल) सुधारणा होण्यासाठी देशाला प्रतिमहिला २.१ मुलांची आवश्यकता असते. जन्माला येण्याच्या वेगापेक्षा लोकांचा मृत्यूदर अधिक वेगवान असेल, तर लोकसंख्या कमी होते. सध्याच्या अंदाजानुसार, २०६४ हे शतकांमधले पहिले वर्ष असेल जेव्हा लोकांच्या मृत्यूची संख्या जास्त आणि जन्मणाऱ्या बाळांची संख्या त्यापेक्षा कमी , अशी स्थिती येईल. जगाचा प्रजननदर १.७ असेल. केवळ दोन पॅसिफिक बेटे आणि चार आफ्रिकी देश प्रजननदराच्या सुधारणा पातळीच्या वर असतील. प्रसिद्ध अमेरिकी उद्योजक एलॉन मस्क वारंवार इशारा देत आहेत, की जागतिक प्रजननदर असाच घटत राहिला तर अनेक देशच्या देश जगाच्या नकाशावरून नाहीसे होतील..आर्थिक, सामाजिक परिणामघटत्या लोकसंख्येचे आर्थिक आणि सामाजिक परिणाम अनेक पटींनी होतात. सर्वांत गंभीर परिणाम म्हणजे वडीलधाऱ्या लोकांना आधार देण्यासाठी कामकाज करू शकणाऱ्या वयाची लोकसंख्याच नसेल. नवनव्या कल्पनांवर अवलंबून असलेली विविध क्षेत्रांतील प्रगतीदेखील त्यामुळे कमी होण्याचा अंदाज आहे, कारण नवकल्पनांचा तरुणाईशी घनिष्ठ संबंध असतो. युवावर्गात नवकल्पना, नवोन्मेषाचे अंकुर फुटतात. त्यांची पुरेशी लोकसंख्या असेल तर अर्थव्यवस्थेला ते उपकारक ठरते. या उत्पादक अशा घटकामुळे लोकसंख्या ला भांश तयार होतो. त्या संधीचा फायदा भारताला घ्यायचा असेल तर लोकसंख्याविषयक धोरणाचा त्यादृष्टीनेही विचार व्हायला हवा.घटत्या जन्मदरावर मात करण्यासाठी विविध उपायांचा विचार केला जातो. घटत्या जन्मदरावर मात करण्यासाठी अनेक विकसित देशांनी मुले जम्माला घालण्यासाठी अनेक सवलती, सुविधा देऊन प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे. तथापि, संशोधनातून असे दिसून आले आहे, की याचा जन्मदरावर फारसा परिणाम झालेला नाही. चीन, रशिया आणि हंगेरीसारख्या देशांमध्ये अशा प्रसूतिपूर्व प्रोत्साहन योजनांमध्ये मध्यमवर्गीय कमावत्या महिलांऐवजी तरुण आणि कामगार-कष्टकरी महिलावर्गावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. .लोकसंख्या अधिक असलेल्या देशांमधून तिथल्या नागरिकांना स्थलांतरासाठी प्रोत्साहन देणे हा आणखी एक उपाय आहे. मात्र, राजकीय धोरणे याच्याआड येऊ शकतात. तो राजकीय दबाव दुर्लक्षित करता येणार नाही. भविष्यात जागतिक लोकसंख्या कमी होत असताना असे स्थलांतर करणाऱ्या लोकांची संख्याही कमीच होईल.मोठ्या वयाच्या लोकांनाही निरोगी राहण्यासाठी आवश्यक सोयीसुविधा पुरविणे आणि दीर्घकाळ त्यांना कार्यरत राहण्यासाठी सक्षम करणे महत्त्वाचे आहे. सिंगापूरमध्ये प्रौढ कामगारांना कामावर ठेवण्यासाठी कंपन्यांना प्रोत्साहन देण्यात येते, तसेच ज्येष्ठ नागरिकांनादेखील कौशल्यविकासासाठी मदत केली जाते. नव्या तंत्रज्ञानाचा शोध आणि अवलंब करणेदेखील महत्त्वाचे आहे. यामुळे कमी लोकांच्या साह्यानेही उत्पादकता उच्च ठेवणे शक्य होते. तंत्रज्ञानाची मदत घेऊन ज्येष्ठ लोकांची काळजी घेणेही शक्य होऊ शकते; तसेच नवे तंत्रज्ञान पालकांना मदत करू शकते. तंत्रज्ञानामुळे प्रजननदर घटण्याला चालना मिळत आहे, की त्यामुळे लोकसंख्येतील वृद्धांचे प्रमाण वाढण्याच्या समस्येवर मात करणे शक्य होईल, हा वादाचा मुद्दा आहे. तंत्रज्ञानाच्या वाढत्या अवलंबामुळे हवामानबदलाचा धोका, लोकसंख्याशास्त्रीय संक्रमण हे जागतिक व्यवस्थेसाठी एक अतिरिक्त आव्हान आहे, हे आता निश्चित झाले आहे. त्यामुळे याचा वेध घेत, जगाने त्यानुसार तयारी करणे आवश्यक आहे.(अनुवाद: प्राची गावस्कर) (लेखिका आयएएस अधिकारी आहेत.).सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.