Premium|Space Geopolitics : अवकाश संशोधनाला सामरिक महत्त्व; चंद्रावरील संसाधने आणि तंत्रज्ञानासाठी देशांमध्ये स्पर्धा

Space Geopolitics and Strategic Technology : अवकाश संशोधनाचे बदलते स्वरूप, चंद्रावरील संसाधनांवरील नियंत्रणासाठी वाढती स्पर्धा आणि राष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक हितसंबंध व जागतिक वर्चस्वासाठी धोरणात्मक तंत्रज्ञानाचे महत्त्व.
Space Geopolitics and Strategic Technology

Space Geopolitics and Strategic Technology

esakal

Updated on: 

अजेय लेले - ajeylele@gmail.com

अवकाश आता केवळ वैज्ञानिक संशोधनाचे क्षेत्र राहिलेले नसून, राष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक हितसंबंध आणि भूराजकीय वर्चस्वाचे

नवे रणांगण बनले आहे. उपग्रह, अवकाशातील शस्त्रास्त्रे आणि चंद्रावर असलेल्या संसाधनांवरील नियंत्रणासाठी सुरू असलेली स्पर्धा आता सिस्ल्युनर आणि डीप स्पेसपर्यंत विस्तारत आहे. चंद्रावरील संसाधने, भविष्यातील मानवी वस्ती आणि अवकाशातील पायाभूत सुविधांवर नियंत्रण मिळविण्यासाठी देशांमध्ये चुरस वाढत आहे. त्यामुळे अवकाश संशोधन हे विज्ञानाबरोबरच सामरिक आणि आर्थिक वर्चस्वाचेही प्रतीक ठरत आहे.

राष्ट्राच्या विकासात तंत्रज्ञानाची प्रगती अत्यंत महत्त्वाची ठरते. जागतिकीकरणामुळे त्याचे महत्त्व अधिकच वाढले आहे. तंत्रज्ञानामुळे जीवनमान उंचावते, उत्पादकता वाढते आणि नवे उद्योग व रोजगाराच्या संधी निर्माण होतात. तसेच जागतिक बाजारपेठेत स्पर्धा करू शकतील, अशी नवनवीन उत्पादने विकसित करणे शक्य होते. तंत्रज्ञानाच्या विकासासाठी सरकारी आणि खासगी क्षेत्राकडून मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता असते. आज तंत्रज्ञानविषयक व्यापार हा आंतरराष्ट्रीय व्यवसायाचा महत्त्वाचा घटक बनला आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडी मिळविण्यासाठी अनेक देश प्रयत्नशील असून, आर्थिक, लष्करी आणि भूराजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यास मदत करणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षमता विकसित करण्यावर त्यांचा भर आहे.

गेल्या काही वर्षांत विशिष्ट तंत्रज्ञानांना ‘धोरणात्मक तंत्रज्ञान’ म्हणून महत्त्व प्राप्त झाले आहे. या तंत्रज्ञानांवर प्रभुत्व मिळवणे आव्हानात्मक असते. लष्करी आणि राजकीय कारणांमुळे त्यांच्या हस्तांतरणावरही विविध निर्बंध असतात. परदेशी पुरवठा साखळ्यांवरील अवलंबित्वामुळे संबंधित देशांच्या सुरक्षिततेसमोर आव्हाने निर्माण होऊ शकतात. अणुतंत्रज्ञान, प्रगत इलेक्ट्रॉनिक्स, अवकाश आणि एरोस्पेस तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान तसेच व्यापक धोरणात्मक परिणाम घडवू शकणाऱ्या अन्य आधुनिक तंत्रज्ञानांचा त्यात समावेश होतो.

Loading content, please wait...