

SpaceX Cursor Deal
esakal
ब्रिजेश सिंह - brijeshbsingh@gmail.com
पाच लाख कोटी रुपयांचा स्पेसएक्स-कर्सर करार हा आकड्यांचा चमत्कार नसून तंत्रज्ञानाच्या नव्या जगाचा आराखडा आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, जागतिक भांडवल, भारतीय प्रतिभा आणि बदलत्या स्टार्टअप संस्कृतीचे अर्थ नव्याने समजून घेण्याची वेळ या कराराने आणली आहे.
भारतीय कॉर्पोरेट जगताच्या इतिहासात आपण अनेक मोठ्या घडामोडी पाहिल्या आहेत. रिलायन्सने हॅमलेज खरेदी केल्याचे, टाटा समूहाने एअर इंडियाला सामावून घेतल्याचे आणि अदाणी समूहाने मुंबईपासून थेट डार्विनपर्यंतच्या बंदरांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केल्याचे आपण मोठ्या अभिमानाने पाहिले आहे. पण, गेल्या महिन्यात, तंत्रज्ञानाची पंढरी मानल्या जाणाऱ्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये असा एक भव्य आणि ऐतिहासिक करार पार पडला ज्यासमोर आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कॉर्पोरेट हालचालीही अगदीच किरकोळ वाटू लागतात. या करारामध्ये असा एक अत्यंत महत्त्वाचा संदेश दडलेला आहे, जो प्रत्येक भारतीय तंत्रज्ञान नेता, आयटी व्यावसायिक, नवउद्योजक आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्याने आवर्जून समजून घ्यायला हवा.