Premium|Spain FIFA World Cup Victory : विजय स्पॅनिश तरुणाईचा...

Spain vs Argentina Final : स्पेनने अंतिम सामन्यात अर्जेंटिनावर संपूर्ण वर्चस्व राखत दुसऱ्यांदा विश्वकरंडक जिंकला. लामिन यमालच्या प्रभावी कामगिरीमुळे स्पॅनिश फुटबॉलने पुन्हा जागतिक वर्चस्व सिद्ध केले.
Spain FIFA World Cup Victory

Spain FIFA World Cup Victory

esakal

Updated on

ब्रह्मानंद शंखवाळकर - saptrang@esakal.com

स्पेनने अर्जेंटिनाभोवती पकड घट्ट केल्यानंतर दक्षिण अमेरिकन संघातील खेळाडू संयम गमावू लागले. खुद्द मेस्सीही निराश भासला. स्पेनविरुद्ध काही मिनिटांचा अपवाद वगळता मेस्सी प्रभावी वाटलाच नाही. या दिग्गज फुटबॉलपटूस नशिबाचीही साथ लाभली नाही. स्पॅनिश संघाने मधमाश्यांप्रमाणे तुटून पडावे अशाप्रकारे अर्जेंटिनावर हल्ला चढविला, यामुळे मेस्सीचा संघ हताश बनला. एकवेळ स्पेनने असे आक्रमण केले, की फक्त गोलरक्षक वगळता त्यांचे सारे खेळाडू अर्जेंटिनाच्या गोलक्षेत्रात होते. त्या वेळचा त्यांचा वेग अचाट होता.

स्पेनने तब्बल सोळा वर्षांनंतर विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत बाजी मारली. २०१० मध्ये त्यांनी सर्वप्रथम जगज्जेतेपद मिळविले, त्यानंतर आता २०२६ मध्ये. मधल्या काळात तीन वेळा त्यांना उपांत्य फेरीही गाठण्यात अपयश आले. या वेळच्या विश्वकरंडक स्पर्धेत स्पॅनिश संघाने उपांत्य फेरीपासून कामगिरी कमालीची उंचावली. अंतिम लढतीत अर्जेंटिनावर पूर्ण वर्चस्व राखत अतिरिक्त वेळेत विश्वकरंडकावर दुसऱ्यांदा नाव कोरले. मला आठवतं, २००२ मध्ये दक्षिण कोरिया-जपानमध्ये झालेल्या विश्वकरंडकात स्पेनने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. तेव्हा मी त्यांचा खेळ प्रत्यक्ष पाहिला होता. त्यांच्या फुटबॉल शैलीने लक्ष वेधले होते, मात्र तेव्हा मला त्यांच्या संघात जबाबदारीने खेळणारा, हमखास गोल करणारा खेळाडू दिसला नव्हता. चार वर्षांपूर्वी २०२२ मध्ये कतारमधील विश्वकरंडक स्पर्धेत मी स्पेनचा खेळ प्रत्यक्ष पाहिला होता, पण तेव्हाही संघ चांगला तुल्यबळ असूनही त्यांनी मला प्रभावित केले नव्हते. ते महत्त्वाच्या फिनिशिंग टचमध्ये कमजोर ठरत होते. कतारमध्ये मी स्पेनचा जर्मनीविरुद्धचा सामना पाहिला होता, त्या वेळी गोल करण्याची संधी असूनही त्यांना अचूक नेम साधणे शक्य झाले नव्हते. ते सततपणे चेंडूवर वर्चस्व राखत होते, पण निर्णायक टप्प्यावर कच खात होते. त्यानंतर आठ वर्षांनी ते आता जगज्जेते बनले. सोळा वर्षांपूर्वी, दक्षिण आफ्रिकेत त्यांनी आंद्रेस इनिएस्ता याने अतिरिक्त वेळेत केलेल्या गोलमुळे अंतिम लढतीत नेदरलँडला हरविले होते. मात्र नंतरच्या काळात स्पॅनिश फुटबॉलला लौकिकास साजेसा खेळ करता आला नाही. त्यांच्या सुदैवाने संघात लामिन यमाल आला आणि स्पॅनिश खेळ प्रभावी ठरू लागला. त्यांची आक्रमणे जास्त परिणामाकारक ठरू लागली. तो स्पॅनिश फुटबॉलमधील धुरंधर आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com