
प्रा. अविनाश कोल्हे
nashkohl@gmail.com
एनसीपीएने सुरू केलेला आगळा उपक्रम म्हणजे ‘पेज टू स्टेज’... त्याअंतर्गत एखादी गाजलेली साहित्यकृती रसिकांसमोर सादर केली जाते. अलीकडेच या उपक्रमात सादर झालेल्या ‘द मार्टर’ कादंबरीचं सादरीकरण आपल्या मनाचा ठाव घेते. ‘पुस्तकाच्या पानापासून ते रंगमंचापर्यंत’ या उपक्रमातल्या सादरीकरणात नाटकाप्रमाणे नेपथ्य असतं, प्रकाश योजना असते, पार्श्वसंगीत असतं, अभिनय असतो, वेशभूषा असते, दिग्दर्शक असतो आणि तरी हे नाटक नसतं...