
प्रवीण दीक्षित
(निवृत्त पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य)
भारतीय संविधानाने स्वीकारलेल्या लोकशाहीप्रणालीला उद्ध्वस्त करून देशातील गोरगरीब आदिवासी समाजाची दिशाभूल करून त्यांना लोकशाहीविरोधी बनविण्याच्या नक्षलवादी चळवळीचा पुढचा टप्पा म्हणजे अर्बन नक्षलवाद. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या (माओवादी) नेतृत्वाखाली ही चळवळ देशात चालविण्यात येते.
या चळवळीचा मूळ उद्देश देशातील प्रस्थापित संवैधानिक व्यवस्थांविरुद्ध जनसमुदायाचा सहभाग. या चळवळीने केलेले गुन्हे ‘यूएपीए’ कायद्याच्या कक्षेत येत नाहीत. विविध न्यायालयांनी सुद्धा अशा घटनांचा ‘यूएपीए’अंतर्गत मर्यादांवर बोट ठेवले आहे. त्यामुळेच जनसुरक्षा कायदासारखा कायदा तातडीने आणण्याची राज्याची गरज आहे.