
सुचित्रा साठे
suchitrasathe52@gmail.com
चैत्राची चाहूल लागताच वसंत ऋतूचं आगमन होतं. फाल्गुनअखेरीस पेटलेल्या होळीच्या निमित्ताने अग्निपूजाही होते. फाल्गुन हळूच काढता पाय घेतो आणि वसंत स्पर्शाने निसर्ग रंगात येतो....
रं तर ‘तो’ येतोय हे वेगळं सांगावंच लागत नाही. मळकटलेल्या वृक्षराजींच्या शेंड्यांना फुटलेली लुसलुशीत इवलीशी कोवळी पानं हे गुपित नकळत फोडून टाकतात. ‘वसंत है आया रंगीला’च्या सुरांनी वातावरण नादावतं.