

Future of Internet Technology
esakal
अच्युत गोडबोले, रोहित पांढारकर
आत्तापर्यंत इंटरनेट सगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्याकरता केबल्स किंवा मोबाईल टॉवर्स सगळीकडे पसरलेले असावे लागायचे. याउलट सॅटेलाइट इंटरनेट म्हणजे थेट अवकाशातल्या कमी उंचीवरून फिरणाऱ्या हजारो उपग्रहांमार्गे इंटरनेट लोकांपर्यंत पोहोचवायचं. यासाठी आपल्या प्रत्येक घरावर, शेतावर किंवा ऑफिसवर एक छोटा डिश अँटेना बसवावा लागेल. तो आकाशात फिरणाऱ्या सॅटेलाइटशी संवाद साधू शकेल. यानंतर तो सॅटेलाइट आणि जमिनीवरचं सॅटेलाइट ग्राउंड स्टेशन यांच्यामध्ये संवाद होईल. यानंतर आपण नेहमीप्रमाणे इंटरनेट वापरू शकू.
सॅटेलाइट इंटरनेटच्या कल्पनेचा इतिहास फार काही जुना नाही. १९९० ते २०१४ दरम्यानचा काळ हा जुन्या आणि खूप उंच (GEO-36000 km) सॅटेलाइट्सचा आणि खूप स्लो इंटरनेटचा होता. त्या काळात लेटन्सी किंवा डीले खूप जास्त असल्यामुळे व्हिडिओ कॉल्स करायला खूप त्रास होत असे.