

State of Finance for Nature 2026
esakal
संतोष शिंत्रे - पर्यावरणाचे अभ्यासक
वार्षिक अर्थसंकल्पाच्या दुंदुभी झडू लागल्या आहेत. सामान्यतः तो सादर झाल्यानंतर त्यात पर्यावरणासाठी किती तुटपुंज्या तरतुदी आहेत वगैरे अरण्यरूदन दरवर्षी करावे लागतेच. या वर्षी थोडा बदल म्हणजे काही संबंधित विश्लेषण आपण आधीच पाहाणार आहोत.आणि त्याला निमित्त आहे संयुक्त राष्ट्रांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या एक महत्वाच्या अहवालाचे. ‘स्टेट ऑफ फायनान्स फॉर नेचर,२०२६’ या नावाचा हा अहवाल मागच्याच आठवड्यात प्रकाशित झाला. विश्वासार्ह आकडेवारी एकत्र होणे, तिला उचित सांख्यिकी तंत्रे वापरून मग विश्लेषण हे सगळे असल्याने यात २०२३ पर्यंतचेच चित्र जरी स्पष्ट होत असले, तरी वारे कोणत्या दिशेने वाहात आहेत, याचा अंदाज त्यात नक्कीच येतो. भावी काळाचे कलदेखील तो दाखवतो.या अहवालातले तपशील तर पाहूच; जोडीने भारताचे त्यातील ‘योगदान’ देखील पाहणे आवश्यक आहे.