
भूषण महाजन
एप्रिल-मेच्या कडक उन्हाळ्यात वळवाचा पाऊस पडला तर धांदल उडतेच, पण तो पाऊस जिवाला गारवा देतो. तसाच गारवा भारतीय शेअर बाजारात सात मार्चला संपलेल्या सप्ताहात अनुभवायला मिळाला. आता हा पाऊस वळवाचा की मृगाचा ते कळेलच! सलग चार आठवडे निर्देशांक खाली आल्यानंतर त्या सप्ताहात प्रथमच थोडी तेजीची झुळूक आली.