

Storytelling and human evolution
esakal
रिता राममूर्ती गुप्ता - info@reetaramamurthygupta.in
कथाकथनामुळे आपले मेंदू मोठे झाले. त्याने आपल्या सामूहिक बुद्धिमत्तेला आकार दिला. जग पुढे जात असताना कथा बदलत आहेत; पण आपल्याला एकत्र बांधून ठेवण्याची त्यांची शक्ती कायम आहे.
आपण वाचू शकण्याच्या खूप आधी, आपल्या पूर्वजांनी कथाकथनाच्या माध्यमातून शिकार आणि धोक्याच्या कथा सांगितल्या. अशा प्रकारे ज्ञानाची देवाणघेवाण केली जात असे. शब्द बोलण्याची आणि त्यांचा अर्थ समजून घेण्याची क्षमता आपल्या मेंदूला घडवत होती. असे संबंध निर्माण करत असे ज्यामुळे आपल्याला इतर सर्व प्रजातींपेक्षा जास्त जगण्यास मदत झाली. कथा सांगणं हे मानवतेचं गुप्त शस्त्र राहिलं आहे. हा तो धागा आहे ज्याने आपल्या प्रजातींना एकत्र बांधलं, आपल्या मेंदूंना चार्ज केलं आणि आपल्याला इतर प्राण्यांपेक्षा उंचावलं. गोष्टी सांगणं हा टाईमपास नव्हता.