

India Bangladesh relations
esakal
नव्या वर्षात भारताला शेजारी धुमसणाऱ्या बांगलादेशाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. पण हे आव्हान केवळ बांगलादेश आणि तिथे फेब्रुवारी महिन्यात होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीपुरते मर्यादित नसेल. त्याचे तेवढेच तीव्र पडसाद केंद्रातील मोदी सरकार आणि पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारसाठी प्रतिष्ठेच्या ठरणाऱ्या मार्च-एप्रिल महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे. या जुळ्या शक्यतांमुळे नव्या वर्षातील पूर्वार्धात केंद्रातील सरकारपुढे काय वाढून ठेवले असेल, याचा ‘मेन्यू’ जवळपास निश्चित झाला आहे.