Premium|Parliamentary Disruption : विसंवादातून कटुतेकडे...!

Government vs Opposition Conflict : २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या आवाहनानंतरही सत्ताधारी-विरोधकांमधील संघर्ष टोकाला पोहचला आहे. नरवणे यांचे पुस्तक, एपस्टिन फाइल्सचे सावट आणि खासदारांच्या निलंबनामुळे संसदीय सुसंवाद धूसर झाला असून, महत्त्वाच्या आर्थिक मुद्द्यांऐवजी राजकीय आरोप-प्रत्यारोपांनीच अधिवेशन गाजले आहे.
Parliamentary Disruption

Parliamentary Disruption

esakal

Updated on

अजय बुवा, नवी दिल्ली

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ होण्याआधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी २८ जानेवारीला आपल्या अभिभाषणात म्हटले होते की लोकशाहीत विषयांवर मतभेद होणे स्वाभाविक आहे; मात्र देशाची सुरक्षा, आत्मनिर्भरता, विकास, ऐक्य यांसारखे विषय मतभेदांच्या पलीकडे असतात. असे सांगताना राष्ट्रपतींनी सर्व खासदारांना अधिवेशन सार्थक ठरण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे २९ जानेवारीला, अधिवेशन सुरू होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजचा काळ अडथळ्यांवर रडत बसण्याचा नव्हे; तर धाडसाने उपाययोजना करण्याचा आहे, असे म्हणत सर्व खासदारांना देशासाठी उपाययोजनांना शक्ती देण्याचे आवाहन केले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com