Premium|Study Room : इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाचे व्यापक परिणाम!

Iran-Israel War 2026 : पश्चिम आशियात अमेरिका-इस्रायलच्या 'ऑपरेशन फ्युरी' आणि 'आयर्न शिल्ड'मुळे युद्ध पेटले असून इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या निधनाने तणाव वाढला आहे. जागतिक अर्थव्यवस्था, इंधन दर आणि भारतीय समुदायावर याचे गंभीर पडसाद उमटण्याची भीती निर्माण झाली आहे.
Iran-Israel War 2026

Iran-Israel War 2026

esakal

Updated on

लेखक: महेश शिंदे

पश्चिम आशिया पुन्हा एकदा जागतिक भूराजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्त लष्करी कारवाई सुरू केली. इस्रायलने या कारवाईला ‘ऑपरेशन आयर्न शिल्ड’ तर अमेरिकेने ‘ऑपरेशन फ्युरी’ असे नाव दिले. या हल्ल्यांचे उद्दिष्ट इराणची अणु आणि क्षेपणास्त्र क्षमता कमकुवत करणे तसेच त्याच्या लष्करी नेतृत्वावर निर्णायक आघात करणे हे होते. या कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते (सुप्रीम लीडर) अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्याने परिस्थिती अधिकच तणावपूर्ण झाली.

या हल्ल्यांनंतर इराणने तात्काळ प्रत्युत्तर देत इस्रायल तसेच खाडीतील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. त्यामुळे हा संघर्ष आता केवळ दोन देशांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो संपूर्ण पश्चिम आशियात पसरत आहे. तेहरान, इस्फहान, मशहद यांसारख्या शहरांमध्ये हवाई हल्ले झाले आहेत. सुरुवातीला मर्यादित स्वरूपाचा वाटणारा हा संघर्ष आता व्यापक प्रादेशिक युद्धामध्ये परिवर्तित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या संघर्षाचे परिणाम केवळ मध्यपूर्वेपुरते मर्यादित न राहता जागतिक अर्थव्यवस्था, ऊर्जा बाजार आणि आंतरराष्ट्रीय राजकारणावरही खोलवर उमटू शकतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com