Premium|Career Guidance : 'लिबरल आर्ट्स'मध्ये आहेत कोट्यवधींच्या पॅकेजच्या संधी; काय आहे हा नवा शैक्षणिक प्रवाह?

Scope of Arts faculty after 12th : दहावी-बारावीनंतर केवळ इंजिनीअरिंग किंवा मेडिकलचाच विचार न करता, बदलत्या काळात 'लिबरल आर्ट्स' आणि आंतरविद्याशाखीय अभ्यासाचे महत्त्व ओळखून विद्यार्थ्यांनी करिअरची नवी क्षितिजे पादाक्रांत करणे काळाची गरज बनली आहे, हे पालकांनीही आता समजून घेतले पाहिजे.
Scope of Arts faculty after 12th

Scope of Arts faculty after 12th

esakal

Updated on

डॉ. अजित कानिटकर

पाल्य दहावी व बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक मध्यमवर्गीयांच्या घरांत चर्चा सुरू होते ती त्याने कोणत्या विद्याशाखेकडे जावे याची. बहुतांशी सर्व शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक वयोगटातील मुले-मुली व त्यांचे पालक अभ्यासक्रम निवडीच्या बाबतीत दोन-तीन विषयांच्या खोड्यातच अडकलेले दिसतात. कला शाखेचे महत्त्वही त्यांनी ओळखायला हवे.

इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा नुकत्याच संपल्या आहेत. परीक्षांच्या तणावातून मुक्त झालेले विद्यार्थी व मुख्यतः त्यांचे पालक आता यापुढे काय, या नव्या चिंतेने पुन्हा त्रस्त आहेत. गेल्या २५ वर्षांत बाह्य परिस्थिती वेगाने बदलली असली तरी दहावी व बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक मध्यमवर्गीय व बहुतांशी सर्व शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक वयोगटातील मुले-मुली व त्यांचे पालक अभ्यासक्रम निवडीच्या बाबतीत दोन तीन विषयांच्या खोड्यातच अडकलेले आहेत. 

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com