Premium|Study Room : सुभाषचंद्र बोस विरुद्ध गांधीजी; स्वातंत्र्य मिळवण्याच्या रणनीतीवर नेमका मतभेद काय होता?

Subhas Chandra Bose Political Journey : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसच्या राजकारणापासून फॉरवर्ड ब्लॉकपर्यंतचा प्रवास केला. गांधीजींच्या अहिंसेपेक्षा ब्रिटिशांविरोधात आक्रमक रणनीती आणि निर्णायक संघर्षावर त्यांनी भर दिला.
Subhas Chandra Bose Political Journey

Subhas Chandra Bose Political Journey

esakal

Updated on

भारतीय स्वातंत्र्यलढा केवळ अहिंसक आंदोलनांचा नव्हता, तर घटनात्मक सुधारणा, जनआंदोलन, क्रांतिकारी चळवळ आणि सशस्त्र प्रतिकार अशा विविध प्रवाहांचा होता. यामध्ये सुभाषचंद्र बोस यांची भूमिका वैशिष्ट्यपूर्ण होती. स्वातंत्र्य हे अंतिम ध्येय मानत असताना ब्रिटिश साम्राज्याच्या जागतिक संकटाचा उपयोग करून ते मिळवण्यासाठी अधिक आक्रमक आणि तातडीची रणनीती आवश्यक असल्याचे त्यांचे मत होते.

सुभाषचंद्र बोस यांचा राजकीय प्रवास भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून सुरू झाला. भारतीय नागरी सेवा परीक्षेत यश मिळूनही त्यांनी ब्रिटिश सरकारची सेवा नाकारून १९२१ मध्ये राजीनामा दिला. चित्तरंजन दास यांच्या प्रभावाखाली त्यांची राजकीय जडणघडण झाली. ते काँग्रेसमधील तरुण आणि डाव्या विचारांच्या नेतृत्वातील महत्त्वाचे नेते बनले. १९३८ मध्ये हरिपुरा अधिवेशनात ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले. १९३९ मध्ये पुन्हा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर गांधीजींच्या समर्थकांशी झालेल्या वैचारिक संघर्षामुळे त्यांनी राजीनामा दिला आणि फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com