
अरविंद जगताप
jarvindas30@gmail.com
खूपदा काही माणसांसोबत अशा काही गोष्टी होतात, की आपण गोंधळून जातो. स्वतः काही न होऊ शकलेले लोकसुद्धा इतरांनी काहीतरी व्हावं म्हणून खूप काही शिकवत असतात. त्या मानाने काय व्हायचं, या गोष्टीवर बोलणारे खूप लोक आहेत; पण अनेकांना काय होऊ नये, असाही प्रश्न पडत असतो.
तुम्हाला आयुष्यात काय व्हायचंय, या गोष्टीत तुम्हाला जेवढा रस असतो तेवढाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना असतो. शाळकरी मुलांना तर हा प्रश्न शंभर लोक तरी विचारत असतात. मोठा झाल्यावर काय व्हायचंय? खरं तर भोवतालची मोठी माणसं कशी वागतात हे बघून खूप मुलांना मोठं व्हावंच वाटत नसेल; पण प्रश्न वेगळा आहे.