
प्रसाद घारे
prasad.ghare@gmail.com
भारतीय संस्कृतीत ‘अन्नदाता सुखी भव’ असे म्हणण्याची परंपरा हजारो वर्षांपासून चालत आली आहे. मात्र, या अन्नदात्या बळीराजावर अस्मानी आणि सुलतानी संकटांचा भडिमार होत असतो. त्यातच त्याचा बळी जात असल्याने तो सुखी होत नाही, हे वास्तव चित्र आहे.
आपल्या परीने हे चित्र मनापासून बदलण्याचा प्रयत्न सांगली जिल्ह्यातील विटा या लहानशा गावातील संतोष जाधव आणि आकाश जाधव हे दोन युवक गेली काही वर्षे करीत आहेत.
यासाठी त्यांनी आधुनिक काळाला साजेशा समाज माध्यमाचा (Social media) लीलया वापर केला आहे. इंडियन फार्मर (Indian Farmer) या यूट्यूब चॅनेलद्वारे ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. त्यांची आता ‘सोशल मीडिया एन्फ्ल्यूएन्सर’ (Influencer) म्हणून ओळख निर्माण झाली आहे. त्यांची ही आगळीवेगळी यशोगाथा...