

Reading habits of successful people
esakal
व्यवसाय, राजकारण आणि क्रीडा क्षेत्रातील जगातल्या सर्वोच्च यशस्वी व्यक्तींमध्ये एक समान मूलभूत सवय आढळते, ती म्हणजे वाचन. हे सर्व जण संकटाच्या वेळी शांत राहण्याची क्षमता पुस्तकवाचनाला देतात. जागतिक नेते वाचनाकडे करमणूक नव्हे; तर ‘अत्यावश्यक शस्त्रसामग्री’ म्हणून पाहतात.
नवीन वर्ष दाखल झालं आहे. नव्या आशा जागृत करण्याची वेळ आली आहे. नवीन सवय लावण्याची वेळ आली आहे. चला, महान व्यक्तींकडून एक चांगली सवय शिकूया.
व्यवसाय, राजकारण आणि क्रीडा अशा क्षेत्रांत असणाऱ्या जगातल्या सर्वोच्च यशस्वी व्यक्तींमध्ये एक समान मूलभूत सवय आढळते, ती म्हणजे वाचन. हे सर्व जण संकटाच्या वेळी शांत राहण्याची क्षमता पुस्तकवाचनाला देतात. जागतिक नेते वाचनाला करमणूक नव्हे; तर ‘अत्यावश्यक शस्त्रसामग्री’ मानतात. ज्ञानवर्धन, जुन्या गृहीतकांना आव्हान देणं आणि धाडसी कृतींसाठी प्रेरणा मिळणं या वाचनाच्या शक्तींबद्दल ते उघडपणे बोलतात.