
आम्ही भाजपमध्ये आल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यावेळी आमचा निर्णय चुकल्याचे म्हटले जात होते. पण, एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले अन् आमचे जोरदार कमबॅक झाले. भाजपची कार्यपद्धती खूप वेगळी आहे. पक्ष एक, नेता एक आणि नेता दोघांनाही न्याय देतो. कोणाला काय वाटते, यापेक्षा नेतृत्वाला काय वाटते ते येथे महत्त्वाचे आहे, असे भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील सांगत होते. ‘सरकारनामा’चे प्रतिनिधी प्रदीप पेंढारे यांनी त्यांच्याशी केलेली बातचीत.