
जगदीप एस. छोकर
ईव्हीएम’वर दीर्घ काळापासून वाद सुरू आहे. त्यात अनेक निराधार युक्तिवादही झाले. त्यानंतर ४ नोव्हेंबर २०१९ रोजी ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ने (एडीआर) सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून पहिले ठोस पाऊल उचलले. मी या ‘एडीआर’चा संस्थापकीय सदस्य आहे. या याचिकेद्वारे निवडणूक आयोगाला अचूक आणि निर्विवाद आकडेवारींच्या मदतीने ‘ईव्हीएम’ आणि ‘व्हीव्हीपॅट’च्या माध्यमातून घेतलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर करण्याचे निर्देश देण्याची विनंती केली होती.
या संदर्भात काही निवडणूक आयोगाला नेमके आणि संक्षिप्त निर्देश देण्याची विनंती याचिकेद्वारे न्यायालयाला करण्यात आली होती. या याचिकेत करण्यात आलेली विनंतीवजा मुद्दे पुढीलप्रमाणे